प्रशांत देशमुख

वर्धा : मोठ्या उत्साहाने, आनंदाने व अपेक्षेने वर्धेला येत आहे, अशी प्रतिक्रिया ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी दिली आहे. औरंगाबाद येथून ते आज पहाटे सहा वाजता इनोव्हा गाडीने समृद्धी मार्गे वर्धेला येण्यासाठी निघाले. सोबत कन्या भक्ती चपळगावकर व अर्धांगिनी नंदिनीताई आहेत. कन्या भक्ती या वडिलांना सोबत म्हणून मुंबईतून आल्यात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवासादरम्यान अकोला येथे पोहचले असताना खास ‘लोकसत्ता’शी बोलताना संमेलनाध्यक्ष चपळगावकर म्हणाले की, वर्धेला येण्याचा आनंदच आहे. वाचक, प्रकाशक, लेखक व साहित्यावर प्रेम करणारे इतर लोक या सर्वांना एकत्र भेटण्याची संधी आहे. साहित्याचा एक वाचक म्हणून व मराठीवर प्रेम करणारा म्हणून मलाही ही संधी घ्यावीशी वाटते. मला माझे विचार मांडण्याची संधी महामंडळाने दिली आहे व इतरांचे विचार ऐकण्याची पण संधी आहे. मोठ्या अपेक्षेने मी वर्धेला येत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आयोजकांनी त्यांची व्यवस्था हिंदी विद्यापीठ परिसरात केली आहे. इथे आल्यानंतर सेवाग्राम, पवणारला भेट देण्याची त्यांची इच्छा असल्याचे श्रीमती भक्तीताई यांनी सांगितले.