राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील छोटी शहरे रेल्वेने जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना मांडली होती. परंतु, केंद्र सरकारने ब्रॉडगेज मेट्रोला मंजुरी दिली नाही. पण, आता त्याच धर्तीवर १०० किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शहरे जोडण्यासाठी वंदे मेट्रोच्या संकल्पनेवर काम सुरू केले आहे.

हेही वाचा >>> गोंदिया : अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा संप सुरूच; कुपोषण वाढण्याची भीती

नागपूर लगतच्या शंभर-दीडशे किलोमीटर परिघातील शहरांना मेट्रोने जोडण्याकरिता ब्रॉडगेज मेट्रो या प्रवासी रेल्वे प्रकल्पाची संकल्पना गडकरी यांनी मांडली होती. यासाठी रेल्वेने केवळ रुळ उपलब्ध करून द्यायचे होते. ते नाकारून त्याऐवजी रेल्वेने ब्रॉडगेज मेट्रोसाठी डब्यांसह वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे वंदे मेट्रोची संकल्पना मांडण्यात आली आहे. भारतीय रेल्वे वंदे मेट्रो विकसित करत आहे. ही देशातील पहिली स्वदेशी अर्ध-वेगवान- वंदे भारत एक्सप्रेसची एक छोटी आवृत्ती असणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर झाल्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन मेट्रो ट्रेनची रचना (डिझाईन) डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केली जाईल, असे सांगितले होते.

हेही वाचा >>> अमित शाह, मुनगंटीवार, दानवेंवरील टीकेवरून भाजपाचा पलटवार; “चंद्रकांत खैरे वैफल्यग्रस्त, ही तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रॉडगेज मेट्रोच्या मूळ संकल्पनेनुसार, रेल्वेच्या विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून नागपूरसह विदर्भातील शहरांना, जलद आणि आरामदायी सेवा देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, बल्लारपूर, नरखेड, काटोल, रामटेक, भंडारा आणि छिंदवाडा आदी शहरांना नागपूरशी जोडले जाणार होते. रेल्वे मंडळाने २०१९ मध्ये ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प अहवाल सादर केला होता. काही त्रुटींमुळे आणि निधीच्या व्यवस्थेमुळे तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. आता रेल्वेने ब्रॉडगेज मेट्रो सारखीच वंदे मेट्रोची संकल्पना मांडली आहे.