छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार विदेशातून भारतात आणण्याच्या मुद्यावरून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आणण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली होती. या मुद्यावरून वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना तलवारीसोबत महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योगही परत आणून युवकांच्या हाताला काम द्यावे, असा टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडेट्टीवार म्हणाले, जगदंबा तलवार परत आणण्याचे स्वागतच आहे. पण त्यासोबत महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग परत आणने महत्त्वाचे आहे. पण तसे न करता केवळ लोकांच्या भावनेशी खेळणे चुकीचे आहे. वडेट्टीवार यांच्या या टीकेला मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यावरून वडेट्टीवार यांना रोजगाराच्या नावावर पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे रोजगार देणारा विभाग रोजगार देईल आणि तलवार आणणारा विभाग तलवार आणेल. परंतु, हे समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असायला हवे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict on vijay vadettiwar and sudhir mungantiwar on jagdamba talwar nagpur tmb 01
First published on: 12-11-2022 at 17:07 IST