चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर तथा अन्य ज्या कुणाला काँग्रेसची उमेदवारी देईल आम्ही त्याचा परिश्रमपूर्वक प्रचार करू, काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करू, असे मत राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. दरम्यान आमदार धाटे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांची चांगलीच कानउघाडणी केली.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शनिवार २० मे रोजी सहकार मेळावा तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले व बाजार समिती सभापती, उपसभापती यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत उपस्थित होते.

हेही वाचा – नागपूर : तापमान वाढीसह पावसाचेही ढग; ‘नवतपा’तील चटके सुसह्य की..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात आभार प्रदर्शन करताना जिल्हा बँकेचे संचालक तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांनी काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलावा, काँग्रेसने उमेदवार बदलला नाही तर विद्यमान खासदाराला आम्ही पराभूत करू असे जाहीर वक्तव्य केले होते.