नागपूर : युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्र देऊन राज्यातील लाखो युवकांची फसवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे, हे फसवणूक करणारे माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या नावाचा वापर करीत आहेत, असा मुद्दा काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला.

डॉ. राऊत यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना युवकांची फसवणूक करणारे ‘रॅकेट’ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, बोकारो पोलाद प्रकल्प (झारखंड), फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया (दिल्ली) स्टील ॲथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार अशा इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील अनेक बेराजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली. २०१८ रोजी नागपुरातील सीताबर्डी येथे राहणारे अनुप चौधरी यांची दहा लाखाने फसवणूक झाली. याप्रकरणी ११ एप्रिल २०२३ रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला. एकूण पाच आरोपी आहेत. चंद्रमणीनगर येथील निशिकांत रगतपुरे, तापेश्वर रगतपुरे, वैष्णवी रगतपुरे , गोंदिया येथील राजेश पिल्लई, विवेक कापगाते हे दोन आरोपी आहेत. या सर्व आरोपींनी माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या नावाचा वापर करून कोट्यवधी रुपयांनी युवकांची फसवणूक केली.

हेही वाचा : नागपूर : सिलिंडरचा भडका उडून अचानक स्फोट; पती-पत्नीसह चार जण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही फसवणूक केवळ हिमनगाचे टोक आहे. हे खूप मोठे ‘रॅकेट’ आहे. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, बिहार या राज्यातील लाखो बेराजगार युवक-युवती या रॅकेटमध्ये अडकले आहेत. गुन्हा दाखल आहे. पण, आरोपपत्र दाखल नाही. पोलीस अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली.