नागपूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून लावण्यात नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांची सक्रिय भूमिका होती. ते त्यांनी स्वतः सांगितले. शिवसेनेत फूट पडल्यावर शिदे यांचीच शिवसेना खरी आहे हे  सांगणारे फडणवीस पहिलेच. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भूमिका महत्त्वाची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> यवतमाळच्या अभियंता तरुणाने कामाचा ताण असह्य झाल्याने उचलले टोकाचे पाऊल…

शुक्रवारी अमित शहा यांचा नागपूर दौरा होता. शिंदेही नागपूरला येणार होते. फडणवीस नागपुरातच होते. शहा-शिंदे फडणवीस प्रथमच एकत्र येणार असल्याने काहीतरी धमाका होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होतेच. शहा यांचे विमान नागपूरला येण्यापूर्वी एक तास आधी केंद्रीय निवडणूक आयोगाची बातमी आली. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह  शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळाले . शहा यांनी त्यांच्या नागपूर भेटीपूर्वी शिदे यांना दिलेली ही भेट आहे, अशी चर्चा आयोगाच्या निर्णयाबद्दल भाजप वर्तुळात  होती.

हेही वाचा >>> “अनिल देशमुख यांचे मतदारसंघात जल्लोषात स्वागत”, जाहीर सभेत म्हणाले, आम्ही अग्निपरीक्षेला…

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नागपुरात विशेष प्रतिक्रिया उमटल्या नाही. कारणशिंदे गटाचे अस्तित्व शुन्य आहे. पण भाजप नेते वृत्त वाहिन्यांना प्रतिक्रिया देत होत. शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे आम्ही आधीच सांगत होते, असा दावा करीत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Connection between amit shah s nagpur visit to and shiv sena party symbols to eknath shinde cwb 76 zws
First published on: 18-02-2023 at 13:06 IST