नागपूर : शेतकरी आत्महत्या करत होते, आता या सरकारने कंत्राटदारांनाही आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही, पीकविमा मिळत नाही सरकारची मदत मिळत नव्हती शेतकरी आत्महत्या करत आहे. आता ही वेळ कंत्राटदारावर आली आहे. सांगलीच्या जलजीवन मिशनचा कंत्राटदार काम केले, पण गेले सहा महिने सरकारने बिल थकवले म्हणून त्याने जीव दिला. सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात बिल थकवली आहे, राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. कंत्राटदारांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे.

मोठ्या कंत्राटदारांसाठी रेड कार्पेट, आणि लहान कंत्राटदारांची बिलं थकवली जात आहे, हा सरकारचा न्याय आहे का?

निवडक लाडक्या कंत्राटदारांना प्राधान्य दिल्यानेच लहान कंत्राटदारांवर ही वेळ आली का? राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे हे सत्य स्पष्ट आहे. आर्थिक शिस्त बिघडली आहे, अजूनही हे सत्य अर्थमंत्री आणि सरकार नाकारणार की जबाबदारी घेणार आहे, असा सवालही एक्स वर वडेट्टीवार यांनी केला. दरम्यान, नागपूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या संशयास्पद मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. आशुतोष अरविंद नाईक (५४, रा. वसंतनगर, दीक्षाभूमी) असे बिल्डरचे नाव आहे. आशुतोष व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होता आणि तो अनेक प्रकल्पावर काम करत होता.

२८ जुलै रोजी आशुतोष कोहली पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अहेगाव येथील त्याच्या शेतात होता. तेथे पिकांवर कीटकनाशके फवारत असताना त्याच्या शरीरात विष शिरले आणि त्याची प्रकृती बिघडली. त्याच दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आल्या. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंचीपाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकांची उधारी

आशुतोष नाईक यांनी त्याच्या काही व्यावसायिक प्रकल्पांसाठी अनेक जणांन पैसे उधार घेतले होते. त्याने एलएडी कॉलेजजवळील एका मोकळ्या जमिनीवर काही कामही सुरू केले होते. त्यासाठी त्याने ७-८ लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले होते. ज्यामध्ये काही भाजप नेत्यांचाही समावेश होता हे पैसे परत करू न शकल्याने त्यांच्याकडून आशुतोषवर दबाव आणल्या जात होता. त्यातून त्याला काही दिवसांपूर्वी एका नेत्याने मारहाणही केल्याची माहिती समोर आली आहे.