संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ बुधवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजता पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे उपस्थित राहणार आहेत.
यंदा एकूण ५५ हजार १९ विद्यार्थी पदवीधर होणार आहेत.
या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना १११ सुवर्णपदके, २२ रौप्यपदके व २१ रोख पारितोषिके अशा एकूण १५४ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. ३ सुवर्ण पदकांसाठी आणि ३ रोख पारितोषिकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही. अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी हागे हिला सर्वाधिक ५ सुवर्ण, ५ रौप्य व २ रोख पारितोषिके प्राप्त झाली आहेत. पारितोषिके प्राप्त करण्यातही यंदा मुलींनी बाजी मारली असून या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ११३ मुली ४३ मुले आहेत.
विद्यापीठांतर्गत आतापर्यंत ४ हजार ७९८ संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय २१० संशोधकांना आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात येत आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत सर्वाधिक २७ आचार्य पदवीधारक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2022 रोजी प्रकाशित
अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बुधवारी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ बुधवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजता पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-05-2022 at 19:28 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Convocation sant gadge baba amravati university wednesday amy