वर्धा : क्रिकेटवर सट्टा लावण्याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरू लागले आहे. ग्रामीण भागातील तरुणांना क्रिकेट बेटिंगची चटक लागल्याचे दिसून येत आहे.

हिंगणघाट येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील विविध सामन्यांवर सट्टा खेळल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुरूनानक वार्डात राहणारा सागर मोहनकुमार दुब्बानी हा ‘बेटभाई डॉट कॉम’ या ऑनलाइन संकेतस्थळावर सट्टा लावत असल्याची चर्चा होती. दिल्लीविरुद्ध गुजरात या सामन्यावर सागर हा आपला सहकारी मनीष रूपचंद खबराणी याच्यासोबत सट्टा खेळताना दिसून आला. त्याच्या भ्रमणध्वनीवर एक ते सहा षटकाच्या सत्रास दिल्लीच्या चमूवर पाच हजार रुपये व सहा ते दहा षटकाच्या सत्रास तीन हजार रुपये असा भाव देत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून दोन भ्रमणध्वनी संच व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

हेही वाचा – चित्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षित ‘इलू’ श्वानाची मदत; ‘ओबान’ पाठोपाठ आता ‘आशा’ही गावाच्या सिमेजवळ

हेही वाचा – यवतमाळ : भरधाव ट्रकची ऑटोला धडक, भीषण अपघातात मायलेकी ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सेलू तालुक्यातील टाकळी येथील सुनील सावरकर याने क्रिकेटचा सट्टा भरविला होता. सामन्यांवर बेटींग करण्याच्या या प्रकारात वेगवेगळ्या गोपनीय क्रमांकावर १५ लाख, ५० लाख व १० लाख रुपये जमा असल्याचे दिसून आले. एकूण १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.