लोकसत्ता टीम

नागपूर : टिप्परच्या धडकेत दोन भावंडाचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, पती रमेश लेकुरवाळे, कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या नेतृत्वात ३७ कार्यकर्त्यांनी टिप्परला आग लावली, अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक केली आणि बेकायदेशिररित्या गर्दी जमा करण्यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले.

२९ डिसेंबरला सकाळी बिडगावजवळ सायकलने जात असलेले सुमित नन्हेलाल सैनी (१५, रा. दुर्गानगर, पारडी) आणि बहिण अंजली सैनी (१८) यांना एका भरधाव टिप्परने धडक दिली. या धडकेत दोघेही भावंड जागीच ठार झाली. या घटनेनंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी अवंतिका लेकुरवाळे यांनी स्पिकर आणि माईकवरून नागरिकांना चिथावणी दिली. नागरिकांना टिप्पर जाळण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानावर दगडफेक करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. टिप्पर चालक बादशहा ठाकूर यालाही नागरिकांनी मारहाण केली होती.

आणखी वाचा-भाजप नेत्या सना खान हत्याकांडाला नवे वळण, नेमके काय घडले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाठोडा पोलिसांनी हवालदार परसराम अतकरी यांच्या तक्रारीवरून अवंतिका लेकुरवाळे, आशीष मल्लेवार, पप्पू शाहू, जानकीप्रसाद ठाकरे, विक्की उर्फ नितीन चकोले, गौरव शाहू, गणेश दुप्पट, शुभम कूलरवाला, अतूल बालबुधे, स्वप्निल वासनिक, रमेश लेकुरवाळे, राजू यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.