दहावीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेत न जाता प्रियकरासोबत त्याच्या घरी गेली. तेथे त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. डॉक्टरकडे गेल्याचे कारण आईला सांगितले. परंतु, मुलगी खोटी बोलल्याचे लक्षात आल्यानंतर चौकशी करण्यात आली. मुलीच्या खोटारडेपणामुळे प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा >>>अ. भा. मराठी साहित्य संमेलन: शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जीतू लहरे (२१, इंदिरामाता नगर, एमआयडीसी) हा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला आहे. त्याची विवाहित बहिण टीमकी परीसरात राहते. तिच्या घरी तो नेहमी ये-जा करीत होता. तिच्या घराच्या शेजारी १५ वर्षीय मुलगी राहते. तिला जीतूने प्रेमाच्या जाळ्यात ओढले३० जानेवारीला मुलगी सकाळी शाळेत गेली होती. तेथून तिला जीतूने घरी ने ले व शारीरिक संबंध प्रस्थापित केले.दुसरीकडे सायंकाळ झाली तरी मुलगी घरी न पोहचल्याने आई-वडिल काळजीत पडले. दरम्यान मुलीने घरी फोन करून दवाखान्यात आल्याचे सांगितले. आई दवाखान्यात पोहचली. मात्र, मुलगी खोटी बोलल्याचे लक्षात आले.चोकशी केली असता तिने खरी घटना सांगितली. आईवडिलांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी जीतूवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.