बुलढाणा : साखर खेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पिठात ८५ व्या जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले. पृथ्वीतलावर अहिंसा व सदभावना आणण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील दुर्गुणांचे मंथन करण्याचे आवाहन, पिठाधिश सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी यावेळी केले.

पलसिद्ध महास्वामी पिठात ८५ व्या जन्मोत्सवाची आज, रविवारी सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पलसिद्ध मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, दीगंबर शिवाचार्य वसमत, विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी, शिवचैतन्य शिवाचार्य हदगाव हे होते. यावेळी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांची ग्रंथ, लाडू, भस्म, गुळ तुला करण्यात आली. पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सिद्धलिंग शिवाचार्य रचित ‘सिद्धानुभूती’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.

हेही वाचा – छगन भुजबळ म्हणतात, “मनोज जरांगेंच्या नादी लागणार नाही, मात्र टीका केली तर…”

हेही वाचा – गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्तींचा मुक्काम, शेतकऱ्यांची चिंता वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संचलन संजय लामधाडे तर आभार विश्वचैतन्य शिवाचार्य यांनी मानले. पाचशे रुग्णांची तपासणी दरम्यान कार्यक्रमानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. यात पाचशे रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.