लोकसत्ता टीम

नागपूर: उद्यापासून म्हणजे १६ मार्चला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्याची व आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मतदार संघातील विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. शुक्रवारी सकाळपासून फडणवीस यांना भेटणाऱ्यांची गर्दी होती, यातून अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी सायंकाळी नागपूर मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. नागपूरमध्ये त्यांचा मुक्काम होता. शुक्रवारी सकाळपासून त्याना भाजपानेत्यांसह इतर पक्षाचेइनेते भेटले. सकाळी सकाळी कॉंग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे भेटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लावले जात आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट होती, असे पारवे यांनी सांगितले. गडचिरोलीचे खासदार अशोक नैते फडणवीस यांना भेटले. अद्याप भाजपने गडचिरोलीच्या उमेदवाराची घोषणा केली नाही. नेते भाजपचे विद्यमान आहेत.

आणखी वाचा- न्यायालयाकडून राज्यपालांची कानउघाडणी, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान निवडणूक आयोगाने उद्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याचे ठरवल्याने व लगेच आचारसंहिता लागू होणार असल्याने सर्व पक्षीय आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील कामांसाठी व ते मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फडणवीस यांची भेट घेतली.