नागपूर : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळायला लागले आहेत. जून महिन्यात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत डेंग्यूचे २१ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक १८ रुग्ण केवळ नागपूर जिल्ह्यातील असल्याने नागपुरात डेंग्यूचा धोका वाढत असल्याचे संकेत आहे.
शहरातील अनेक भागात डास वाढले आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत असतानाच आता अधून-मधून जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्णही आढळत आहे. जूनमध्ये नागपूर शहरात ११, नागपूर ग्रामीणला ७ असे एकूण १८ रुग्ण आढळले. गोंदिया जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात २ रुग्ण नोंदवले गेले. तर वर्धा, भंडारा, गडचिरोलीत सध्या एकाही रुग्णाची नोंद नाही. या वृत्ताला आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.
हेही वाचा >>>Monsoon Update: येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
पूर्व विदर्भातील डेंग्यूची स्थिती
१ जानेवारी ते ३० जून २०२३
शहर/ जिल्हा रुग्ण
नागपूर (ग्रा.) १३
नागपूर (श.) २८
वर्धा ०३
भंडारा ००
गोंदिया १५
चंद्रपूर (ग्रा.) ०९
चंद्रपूर (श.) ०२
गडचिरोली ११
एकूण ८१