नागपूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नागपुरातील दिशांक बजाजने विजेतेपद पटकावले. १९ वर्षाखालील गटात दिशांकने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांची कमाई केली.

अंश धनवीज साडेचार गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. श्रद्धा बजाज, वृत्तिका गमे यांनीही स्पर्धेतील विविध वयोगटात दमदार कामगिरी केली. मुलींच्या १४ वर्षे वयोगटात श्रद्धाने सहापैकी साडेचार गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकाविले. वृत्तिका गमे स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिली. विजेता खेळाडू राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

हेही वाचा… चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात स्कूल बस चालक ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिशांक हा एमकेएच संचेती विद्यालयाचा विद्यार्थी आहे तर अंश धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. श्रद्धा बजाज नारायण विद्यालय तर वृत्तिका सोमलवार शाळेतील विद्यार्थीनी आहे.