- युवकाचा खून
- खापा येथील घटना
हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान एकाच समाजातील दोन गटात अचानक वाद उदभवला आणि दोन्ही गटांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. पंकज गोपाल जुनघरे (22) रा. नवीन वस्ती, खापा असे मृताचे नाव आहे.
आज संध्याकाळी खापा नयी बस्तीच्या हनुमान मंदिरातून गावात हुनमान जयंतीनिमित्त रॅली काढण्यात येणार होती. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण होते. तर समाजातील तरुणांचे दोन गट आपापल्या परीने तयारी करीत होते. संध्याकाळी रॅली निघण्याच्या वेळेवर तयारीवरून दोन गटात वाद झाला. त्यानंतर हा वाद सोडविण्यात आला आणि रॅली काढण्यात आली. मात्र, मंदिरातून रॅली पुढे गेल्यानंतर पुन्हा तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. पंकजला छातीवर आणि डोक्यावर हाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण करण्यात आल्याने तो निपचित पडला. त्यानंतर काहीजन घटनास्थळावरून पळून गेले. तेथील लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पंकजला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर आणि खापा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनाम करून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशीरापर्यंत आरोपींचा शोध सुरू होता.