नागपूर : दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसु बारसला सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी धनत्रयोदशीला मात्र सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहर्तावर सोने- चांदीची खरेदीसाठी बाहेर बडलेल्या ग्राहकांना मोठी दिलासा मिळाला आहे. दरम्यान धनत्रयोदशीला सोने- चांदीचे दर काय आहे? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
करोनानंतर सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणावर लावलेल्या करानंतर सोन्याचे दरात जास्तच वाढ झाली. दरम्यान सर्वत्र दिवाळीत मोठ्या प्रमानावर ग्राहकांकडून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने वा देवी- देवतांच्या मुर्तीही खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीला दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्तच राहते. परंतु यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी १७ ऑक्टोंबरला सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्याने ग्राहकांकडून खरेदीबाबत प्रतिसाद कसा राहिल याबाबत चिंता व्यक्त होत होती. परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
नागपुरातील सराफा बाजारात दिवाळीच्या पहिल्या दिवशी १७ ऑक्टोंबरला वसु बारसच्या दिवशी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम जीएसटी आणि मेकिंग शुल्क वगळून २४ कॅरेटसाठी १ लाख ३१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख २२ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ लाख २ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८५ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८५ हजार ४०० रुपये होते. हे दर दुसऱ्या दिवशी शनिवारी धनत्रयोदशीच्या मुहर्तावर २४ कॅरेटसाठी १ लाख २८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख १९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ लाख २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८३ हजार ५०० रुपये होते. त्यामुळे एकाच दिवसात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम २४ कॅरेटमध्ये २ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटमध्ये २ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटमध्ये २ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण…
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसु बारसला (१७ ऑक्टोंबर) चांदीचे दर प्रति किलो १ लाख ७९ हजार ५०० रुपये होते. हे दर १८ ऑक्टोंबरला १ लाख ७० हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून ९ हजार रुपयांची घसरण झाली. तर प्लॅटिनमचे दरही प्रति दहा ग्राम ६० हजार रुपये नोंदवले गेले.