नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल पुन्हा भारतीय विमान प्राधिकरणाच्या मेल आयडीवर धडकल्याने मंगळवारी सुरक्षा यंत्रणा हादरल्या. सकाळी साडेसहा वाजता धमकी देणारा हा ई- मेल भारतीय विमानतळ प्रशासननाला ई- मेल पत्त्यावर मिळाला. याची माहिती मिळताच सकाळी शिघ्र प्रतिसाद दलासह बॉम्ब शोध आणि नष्ट पथक आणि श्वान पथकाला तातडीने विमानतळावर पाचारण करण्यात आले.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सिंगारेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले, की विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती मिळताच, सकाळी सोनेगाव पोलीस ठाण्यातील ४० पोलिसांची टीम, पोलीस आयुक्तालयातील बॉम्ब शोध आणि नष्ट पथकातील ८ जवान, शिघ्र प्रतिसाद दलाची टीम, १ स्निफर श्वान चार पोलिस जवान आणि विमानतळावर तैनात सुरक्षा रक्षकांना विमानतळावर पाचारण करण्यात आले. धमकी देणाऱ्या इ मेलमुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली आहे. यापूर्वी गेल्यावर्षी २९ एप्रिल, १८ जून आणि २४ जूनला आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मधकी देणारे तीन इ मेल धडकले होते. 

धमकीचे तार तमिळनाडूत

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सिंगारेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळांना धमकीचे ई मेल पाठविणारा माथेफिरू डार्क वेब एक्सेस टॉर कम्युनिकेशन ब्राऊजर वापरत आहे. त्याचे ठिकाण शोधले जात आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यानेच नागपूर आणि छत्रपती संभाजी खंडपीठालाही धकमी देणारा ई मेल पाठविले होते. तमिळनाडूतही त्याने धमक्या देणारे ५० मेल पाठविले आहेत. कर्नाटक, तमिळनाडू पोलीस आणि केंद्रिय गुप्तचर शाखेचे पथकही त्याच्या मागावर आहेत.

तपासणी मोहीम सुरू

विमानतळ प्रशासनाला मंगळवारी सकाळी धमकीचा ई-मेल आल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलिसांकडून विमानतळ परिसरात कसून तपासणी मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर विमानतळाची सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कसून झडती घेतली. या संदर्भात विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आयईडी बॉम्ब ठेवल्याबद्दल ईमेल प्राप्त झाला. ई-मेलमधील मजकूर सकाळी नागपूर विमानतळ अधिकाऱ्यांना कळवण्यात आला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळ परिसराची कसून तपासणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोज सात ते आठ हजार प्रवासी

नागपुरातून देशातील प्रमुख शहरात तसंच परदेशात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या वर्दळीच्या आणि महत्वाच्या विमानतळाला बॉम्बनं उडवण्याची धमकी वारंवार मिळत असल्यानं सुरक्षा यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहे. या विमानतळावरुन दररोज सरासरी सात ते आठ हजार लोक विमान प्रवास करतात. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, इंदौर, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, लखनौ, नाशिक, बेळगाव, अजमेरसाठी विमानं असून याशिवाय शारजहा आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय विमानसेवाही आहे.