नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नवीन अधिकारी नागपूर विभागाचा प्रभाव स्वीकारण्यात तयार नसताना पुरवणी परीक्षेच्या तोंडावर अमरावतीचे शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांच्याकडे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाची धुरा सोपविली आहे. विशेष म्हणजे शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर पटवे यांनी अटकेच्या भीतीने अंतरिम जामीन घेतला असताना त्यांच्याकडे अध्यक्ष पद सोपावण्यात आले आहे.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना अटक झाल्यानंतर हे पद खाली होते. विशेष म्हणजे राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा काही दिवसावर आहेत. अश्या वेळी अध्यक्ष पद रिक्त असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेष म्हणचे, शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे कुणीही अधिकारी नागपूर विभागात येण्यात तयार न्हवते. अश्यात डॉ. पटवे यांनी अध्यक्ष पदाची धुरा हातात घेतली आहे. विशेष म्हणजे वंजारी यांच्या अटकेनंतर बोर्डाची विस्कटलेली घडी बसवणे हे पटवे यांच्या समोर आव्हान राहणार आहे.

अटकेत असलेले, चिंतामण वंजारी हे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी २०२४ मध्ये वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी आपला अहवाल सादर केला. यावेळी असा आरोप करण्यात आला की ५८० बनावट “शालार्थ आयडी” तयार करण्यात आली आणि अपात्र शिक्षकांना पगार मंजूर करण्यात आला.

या प्रकरणाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष चिंतामण वंजारी होते. या घोटाळ्यात, बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षकांना पगार मंजूर केल्याचा आरोप आहे. चिंतामण वंजारी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना हा घोटाळा केल्याचे तपासात उघड झाले.

पटवे यांना नागपूरचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. पटवे यांनी यापूर्वी नागपूर विभागात अनेक वर्षे काम केले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालतात ते सह संचालक होते. तसेच त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. पटवे यांना नागपूर विभागातील शिक्षण क्षेत्राचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.