नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली करण्यात आली. त्यानंतर या पदाची धुरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्य अपर सचिव व्हि राधा यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून कायमस्वरूपी सचिव मिळेपर्यंत सौरभ कटियार यांच्याकडे सचिव पदाचा अतिरिक्त प्रभाव राहणार आहे. डॉ. सुवर्णा खरात यांची तीन वर्षांआधी त्यांची एमपीएससीच्या सचिव पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची अचानक बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन आदेशानुसार डॉ. खरात यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही एक भारतीय राज्यघटनेवर आधारित घटनात्मक संस्था आहे, जी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवा व पदांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करून पात्र उमेदवारांची निवड करते. ही संस्था भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ नुसार स्थापन झाली आहे. गुणवत्तेनुसार व आरक्षणाच्या नियमांनुसार भरती करते. एमपीएससी विविध राज्याच्या सेवा जसे की महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा आणि महाराष्ट्र वन सेवांसाठी परीक्षा आयोजित करते. एमपीएससीमध्ये सचिव हे प्रशासकीय महत्त्वाचे पद आहे. या पदावर तीन वर्षांआधी डॉ. खरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ हा चांगलाच वादग्रस्त ठरला होता.
खरात यांच्या निवडीनंतर एमपीएससीच्या विविध परीक्षा आणि निकाल रखडल्याचा आरोपही अनेकदा झाला आहे. मात्र, मराठा आरक्षणामुळे विविध परीक्षांच्या जाहिराती पुन्हा नव्याने तयार करण्यात आल्या. यामध्ये मराठा आरक्षणही लागू करण्यात आल्याने परीक्षा आणि निकालाला विलंब झाला होता. मात्र, या काळात डॉ. खरात यांच्यामुळे परीक्षांना विलंब होत असल्याचा आरोपही झाला होता. अखेर १९ सप्टेंबरला त्यांची कौशल्य विकास विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या सचिव पदाचा प्रभार कुणाकडे दिला जातो हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोण आहेत सौरभ कटियार ?
सौरभ कटियार हे २०१६ बॅचमधील ‘आयएएस’ अधिकारी आहेत, जे महाराष्ट्र कॅडरचे आहेत आणि सध्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. ते यापूर्वी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि मुंबईत उपनगराच्या विकासाची धुरा सांभाळत आहेत.
माहिती आणि पार्श्वभूमीते २०१६ बॅचचे ‘आयएएस’ अधिकारी असून महाराष्ट्र कॅडरमध्ये आहेत.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी: राज्य सरकारने त्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. अमरावती जिल्हाधिकारी: यापूर्वी त्यांनी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
यूपी टॉपर: ते उत्तर प्रदेशचे टॉपर असून आयआयटी ग्रॅज्युएट आहेत.