नागपूर: नागपूरमध्ये सध्या नागपूर- मुंबई महामार्गाच्या उद्घाटनाच्या तयारीची धावपळ सुरू आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच उद्घाटनापूर्वी महामार्गाची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये दाखल झाले.

हेही वाचा: “शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. ते म्हणाले या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. त्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार हे मी भाग्य समजतो., असे शिंदे म्हणाले. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना होती. ती तत्कालीन सा. बा. मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली. नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. तेव्हा मी नगरविकास मंत्री होतो. आता मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे, असे शिंदे म्हणाले.