नागपूर : विदर्भासह राज्यातील बऱ्याच भागात पाऊस लांबल्याने वीजेची मागणी पावसाळ्यात तब्बल २६ हजार मेगावॅटपर्यंत वाढली आहे. ही मागणी काही दिवसांपूर्वी २१ हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती, हे विशेष.

राज्यात पाऊस नसल्याने सर्वत्र विजेचे उपकरण असलेल्या पंखे, वातानुकुलीत यंत्रांसह इतरही उपकरणांचा वापर वाढला आहे. तर दुसरीकडे गरजेनुसार काही भागांत कृषीपंपाचाही वापर वाढला आहे. त्यामुळे स्टेट लोड डिस्पॅच केंद्राच्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी दुपारी २.३० वाजता वीजेची मागणी २६ हजार १२ मेगावॅट नोंदवली गेली. त्यापैकी राज्यात १६ हजार २९९ मेगावॅट वीजेची निर्मिती होत होती.

हेही वाचा : १४ दिवसांनंतर अखेर भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक ६ हजार ५९७ मेगावॅट वीज निर्मिती महानिर्मितीच्या राज्यातील विविध प्रकल्पांतून होत होती. त्यात औष्णिक प्रकल्पातील ५ हजार ५८८ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातील ९४१ मेगावॅट, सौर प्रकल्पातील ७० मेगावॅट निर्मितीचा समावेश होता. तर खासगी प्रकल्पांपैकी अदानी प्रकल्पातून २ हजार ५६४ मेगावॅट, जिंदल प्रकल्पातील ८४० मेगावॅट, रतन इंडियातील १,३०० मेगावॅट, एसडब्लूपीजीएल प्रकल्पातील ३८४ मेगावॅट वीज निर्मिती होत होती. तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९ हजार २०३ मेगावॅट वीज मिळत होती.