नागपूर : नागपूर विभागात बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ आयडी तयार करून हजारो शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा विधीमंडळात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. या घोटाळ्यामुळे शिक्षण विभाग बदनाम होत असल्याचे दटके म्हणाले.
राज्य सरकारने २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी आणली त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा सुद्धा सुरू करण्यात आली २०१९ ते २२ यादरम्यान मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती करण्यात आली मात्र अनेक नियुक्त्या २०१२ पूर्वीच दाखवण्यात आल्या आहेत तसेच एकाच व्यक्तीला दोनदा नियुक्ती देण्याचाही प्रकार उघड होत आहे त्याचप्रमाणे दिवंगत अधिकाऱ्याच्या नावे बोगस सह्या दाखवून सरकार आणि नागरिकांची फसवणूक झाली आहे, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या बोगस शिक्षकांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली शासन करणार का ?असाही सवाल दटके यांनी सभागृहात उपस्थित केला.
१. दिवंगत निवृत्त शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शिक्षकांना मागील तारीख टाकून बोगस नियुक्ती देण्याचा प्रताप शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे, या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे शिक्षण आयुक्त यांना निर्देश देण्यात आले होते त्याप्रमाणे कार्यवाही झाली आहे का ?
२. अशा बोगस पद्धतीने कागदपत्रे देऊन आणि बनावट स्वाक्षऱ्या करून २११शिक्षक दोन मुख्याध्यापक१८ कनिष्ठ लिपिक आणि १३ शिपाई यांना खोट्या मान्यता देण्यात आले आहेत त्यांच्यावर कोणती कार्यवाही केली.
३. शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष ३ वेळा बदलण्यात आले . सुरुवातीला नरड त्यानंतर डॉक्टर सावरकर आणि त्यानंतर वंजारी परंतु हे तिघांनाही आरोपी ठरवण्यात आल्याने चौकशी पारदर्शक पद्धतीने होणार का ?
४. राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून २७०० शिक्षक भरती झाले असताना याबाबत आजपर्यंत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे ? किती आरोपी निश्चित केले आहेत?
५. एसआयटी मार्फत सुरू असणारी चौकशी पूर्ण करण्यासाठी शासनाने विशिष्ट कालमर्यादा ठरवली आहे का ?
या सर्वच बाबतीत शासनाने आपली भूमिका सभागृहासमोर ठेवावी तसेच सध्याचे अधिकारी हे चार्जवर असून पुन्हा असा घोटाळा होऊ नये याकरिता शिक्षण विभागाच्या व्यतिरिक्त इतर विभागातील आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी प्रमाण दटके यांनी केली
यावेळी घडलेला प्रकार हा निंदनीय असून शिक्षण विभागाला काळी माफ असणारा आहे .१९अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत आरोपी बनवण्यात आले असून दोशींवर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आश्वासित केले.