नागपूर : यशोधरानगरातून बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय तरुणीवर दोन ट्रकचालकांनी ट्रकच्या केबिनमध्ये बलात्कार केला. हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून तरुणीच्या डोक्यावर टाॅमीने वार करून खून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ग्रामीण पोलिसांनी दोन ट्रक चालकांना अटक केली.

नागपुरातून १९ ऑगस्टला बेपत्ता झालेली तरुणी मौद्यातील नावकार कंपनीजवळ पोहोचली. रात्री तीन वाजता ट्रकचालक आरोपी महेंद्र प्रभाकर मिसार (३५, खेड, जि. चंद्रपूर) आणि प्रशांत आनंद ताकतोडे (२९, नागपरसोडी, जि. भंडारा) यांना ती तरुणी रस्त्यावर फिरताना दिसली. दोघांनीही तरुणीला विचारणा केली. घाबरलेल्या तरुणीला दोघांनी उचलले आणि ट्रकच्या केबिनमध्ये कोंबले. तिच्यावर दोघांनीही सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तरुणीला अस्ताव्यस्त अवस्थेत ट्रकखाली फेकले.

हेही वाचा – रस्त्यावर बांगड्या विकणारा तरुण बनला आयएएस अधिकारी! दोन वेळच्या जेवणाची होती भ्रांत, रमेश घोलप यांची प्रेरणादायी कहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – प्रेमाचा त्रिकोण; वर्गमित्राला चाकूने भोसकले

मात्र, तरुणी पोलिसात जाण्याची शक्यता असल्याने दोघांनीही टॉमीने तिच्या डोक्यावर हल्ला करून खून केला. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार यांच्या पथकाने आरोपींनी अटक केली.