scorecardresearch

Premium

खोदकामापूर्वी सरकारी यंत्रणांना या प्रणालीवर करावी लागणार नोंदणी

विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी दूरसंचार विभागाने ‘ कॉल बिफोर यू डीग ‘ ही प्रणाली तयार केली आहे.

Government agencies register call before you dig system before digging
खोदकामापूर्वी सरकारी यंत्रणांना या प्रणालीवर करावी लागणार नोंदणी (Photo – Indian Express)

नागपूर: विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणेला विविध ठिकाणी खोदकाम करावे लागते. ते करताना त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या इतर सुविधांना हानी पोहोचते. सेवा पुरवठा खंडित होतो व त्याचा फटका अंतिमतः नागरिकांना बसतो. त्यामुळे खोदकाम करणारी संस्था आणि त्यामुळे उद्भवणा-या समस्या टाळण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी दूरसंचार विभागाने ‘ कॉल बिफोर यू डीग ‘ ही प्रणाली तयार केली आहे.

खोदकाम करणा-या संस्थांना या प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक केले होते. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही सरकारी मालमत्ताधारक व खोदकाम करणा-या संस्थांना नोंदणी करणे राज्य शासनानेही बंधनकारक केले आहे. ही प्रणाली अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये उपलब्ध असून प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. त्यात नगर विकास विभाग, ग्राम विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग,वन खाते, परिवहन, ऊर्जा, जलसंपदा आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी वरील प्रणालीवर नोंदणी करायची आहे.

promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
Prayas Energy Groups work is primarily in the context of energy and power sector policies and consumer interest
वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’
cargo vehicles through Udhwa Kasa
पालघर : दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावरील दंड टाळण्यासाठी मालवाहतूक वाहनांची उधवा कासा मार्गे वाहतूक
How do Uber OLA BluSmart inDrive charge
Uber, OLA, BluSmart, inDrive तुमच्याकडून कशा पद्धतीने शुल्क आकारतात? कर्नाटक सरकारचा नियम जाणून घ्या

हेही वाचा… भंडारा: प्रसुतीपश्चात महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप

या यंत्रणांना उत्खनन करण्यापूर्वी ज्या ठिकाणी खोदकाम करायचे आहे तेथील मालमत्तेशी संबंधित व्यक्ती, संस्था, प्राधिकरणे, कार्यालयांनी करावयाच्या कामांची नोंदणी ‘ कॉल बिफोर यू डीग’ प्रणालीवर करून संबंधितांना खोदकामाची सूचना द्यायची आहे. त्यानंतर तेथे पूर्वी असलेल्या पायाभूत सुविधांना धोका उद्भवू नये याची काळजी घेतली जाणार आहे. पूर्व सूचना देऊनही संबंधित संस्थेने दाखल घेतली नाही तर खोदकाम करणा-या संस्थांना त्यांचे काम करण्यास मोकळिक असेल.

नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई

खोदकाम करताना पायाभूत सुविधांची हानी झाल्यास संबंधित यंत्रणेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. खर्चाची आकारणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरानुसार केली जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाने ४ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयात नमुद केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Government agencies have to register on call before you dig system before digging cwb 76 dvr

First published on: 05-12-2023 at 16:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×