scorecardresearch

Premium

राज्यपाल आठवडाभर विदर्भात, काय आहेत कार्यक्रम?

सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ९ रोजी सकाळी ते भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Governor Ramesh Bais visiting Vidarbha
राज्यपाल आठवडाभर विदर्भात, काय आहेत कार्यक्रम ? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: राज्यपाल रमेश बैस हे गुरूवार ७ ते १३ डिसेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे या काळात नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ९ रोजी सकाळी ते भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

शनिवार ९ डिसेंबरला अमरावती जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पूरस्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ३:३० वाजता अमरावती येथून वर्धाकडे प्रयाण करतील. वर्धा येथील विकास भवन, गांधी चौक येथे सायंकाळी ५ वाजता रोटरी क्लबच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. रविवार १० डिसेंबर रोजी राजभवन, नागपूर येथे राखीव.

Maharashtra State Backward Classes Commission the survey of Maratha community and open category citizens has started pune news
पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग: ‘एवढ्या’ कुटुंबांची माहिती झाली संकलित
Pune collector on Maratha community survey
मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही अडथळ्यांची शर्यत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले ‘हे’ कठोर निर्णय
various parties protested against governments by carrying out funeral procession of evm
सातारा शहरातून ईव्हीएमची अंत्ययात्रा; केंद्र व राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा
uddhav thackeray perform puja at kalaram mandir in nashik
उद्धव ठाकरेंकडून काळाराम मंदिरात पूजा; शिबिर, सभेच्या माध्यमातून नाशिकमध्ये आज शक्तिप्रदर्शन

हेही वाचा… एक कार्यालय अन् दोन गट; राष्ट्रवादीतील फुटीचे अधिवेशनात पडसाद

सोमवारी ११ ला रोजी पोरला, (गडचिरोली) येथील शिवाजी कनिष्ठ कला महाविद्यालय येथे होणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. मंगळवारी १२ रोजी सायंकाळी राजभवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात अधिकाऱ्यांची बैठक घेतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Governor ramesh bais is visiting vidarbha from thursday 7th to 13th december cwb 76 dvr

First published on: 07-12-2023 at 12:53 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×