नागपूर : उपराजधानीसह मध्य भारतातील बऱ्याच भागात ऑक्टोबर – २०२२ ते जानेवारी – २०२३ दरम्यान कफ, सर्दी, गळ्यात सूज, श्वसनाचा त्रास असलेल्या आजारांचा विळखा होता. क्रिम्स रुग्णालयाने या काळात त्यांच्याकडे उपचाराला आलेल्या रुग्णांवर अभ्यास केला. त्यात निम्म्या रुग्णांच्या आजाराला सिमेंट रस्ते, वाहनांतील प्रदूषणासह इतर कारणाने होणारे वायू प्रदूषण प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष पुढे आले. या काळात नेहमीच्या तुलनेत या त्रासाच्या रुग्णांमध्ये २५ टक्के वाढही नोंदवली गेली.

ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान नागपुरातील हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) ही १४०-२१० दरम्यान (प्रदूषण वाढलेली) होती. क्रिम्स रुग्णालयात या काळात सर्दी, खोकला, श्वसनाचा गंभीर आजार घेऊन सुमारे ४०० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी सुमारे २०० रुग्णांच्या इतिहारात वायू प्रदूषण कारण पुढे आले. दाखल रुग्णांना रस्त्यावरील धूळ, बांधकामामुळे तयार होणारी धूळ, वाढत्या वायू प्रदूषणाचा खूपच त्रास झाल्याचे पुढे आले. वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांमध्ये शहराच्या जवळपासचे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, कोळसा खदानी, विविध वस्तूंचे उत्पादन घेणारे उद्योग व त्यातून बाहेर पडणारे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कणयुक्त प्रदूषण प्रमुख कारण असल्याचे सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले.

हेही वाचा – धक्कादायक ! शिक्षण संस्थाचालकाकडे मागितली पंचवीस लाखांची खंडणी; आरोपी तुरुंगातच

वाहतूक व रस्त्यांवर विविध गाड्यांमधून निघणार्‍या प्रदूषणामध्ये कार्बनची कणे, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, काही कणयुक्त प्रदूषण आणि डिझेलच्या ज्वलनामुळे निर्माण होणारे सल्फर डायऑक्साईड यांचा उत्सर्जनामुळे रुग्ण इस्पितळात पोहोचली आहेत. त्यामध्ये विशेषकरून लहान मुलं- बाळं, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना पूर्वीपासून श्वसनविकार आहेत, त्यांच्यावर अधिक प्रभाव पडला. बांधकाम प्रक्रियेतून आणि सिमेंट रस्त्यातून निर्मित प्रदूषणामुळेदेखील रुग्णांना श्वसनरोगाचा त्रास झाल्याचे डॉ. अरबट यांच्या निदर्शनात आले.

हेही वाचा – महिला पोलिसाची हत्या करून रेल्वेने पळून जाणाऱ्या दोघांना नागपुरात अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायर व सिमेंटच्या रस्त्यादरम्यान झालेल्या घर्षणामुळे कणयुक्त प्रदूषके निर्माण होतात, धुळीकण वातावरणात उडतात. याशिवाय या घर्षणामुळे ध्वनिप्रदूषणदेखील होते. तापमान शोषणाच्या स्वभावामुळे शहरी भागात स्थानिक तापमानवाढदेखील नोंदविल्या जात आहे. त्यामुळे जमिनीच्या स्तरावर ओझोनचे प्रमाण वाढते आणि श्वसनविकारांना आमंत्रण मिळते. वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होते. श्वसन नलीकेचे विकार होतात. कफ वाढणे, शिंका, श्वास घेण्यास त्रास, ब्रॉन्कायटिस, अस्थमा-सीएओपीडीसारख्या विकाराला ट्रिगर मिळणे, गळ्यात व नाकात त्रास, हृदयविकार, त्वचेचे विकार, डोळ्यांचे विकार अशी लक्षणे सामान्यतः या प्रदूषणामुळे दिसून येत आहेत. ओझोनच्या वाढलेल्या स्तरामुळे मुख्यतः अस्थमा विकास वाढून अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. याशिवाय २० टक्के फुफ्फुसाचे कर्करोग धुम्रपान न करणार्‍यांना होत असल्याचेही डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले. नागरिकांनी हा त्रास टाळण्यासाठी वृक्षारोपन वाढवणे, रस्त्यावर मास्क घालून प्रवास करणे, थोडाही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.