नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूरची दाणादाण उडाली आहे. एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

हेही वाचा – नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात

हेही वाचा – नागपूरसह विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’, येत्या ४८ तासांत मोसमी पाऊस सक्रिय राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांत २ एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दलसुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.