नागपूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडे सरकले असून राज्यात दमदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शनिवारी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान खात्याने दिला आहे.

मॉन्सूनची शक्यता असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, रायसेन, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, संबलपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैऋत्य राजस्थानपासून उत्तर ओडिशापर्यंत, तसेच पूर्व-मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कोकणपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

हेही वाचा – मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या, प्रवासी वाढतील? सोमवारपासून नागपुरात दहामिनिटांनी…

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने पुनरागमन केले आहे. शुक्रवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता शनिवारीदेखील राज्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा – विलंबाने वीज देयक भरल्यास किती दंड बसतो माहीत आहे काय? मग हे वाचाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात ढगाळ हवामान झाले असून, अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, विदर्भातील अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर उर्वरित कोकण, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.