नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील गोरेवाडा धरण भरले असून चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने आलपल्ली- भामरागड हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

नागपूर शहर व ग्रामीण परिसरात पूरस्थिती –

विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. नागपूर शहर व ग्रामीण परिसरात पूरस्थिती उद्भवली आहे. वर्धा नदिवरील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असून आर्वी ते राजुरा मार्ग बंद झाला आहे. इरई नदीला आलेल्या पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील मौजा माना ते हडस्ती मार्ग बंद आहे. वेजगाव नाल्याला आलेल्या पुरामुळे तोहगाव ते लाठी मार्ग बंद आहे.

नागपुरात पावसाचे थैमान; गोरेवाडा, अंबाझरी ‘ओव्हरफ्लो’, वाठोड्यातील झोपड्यांमध्ये पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोंदिया जिल्ह्यातील सिंधीटोला पागोली नदीवरील पूल तुटल्याने आमगावचा संपर्क तुटला आहे. वर्धा तालुक्यातील पवनुर गावाजवळील वनविभागाचा वनराई बंधारा फुटल्याने आंजी ते पवनूर रस्ता बंद आहे.