नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज प्रकल्प विस्तारीकरणाविरुद्ध दाखल जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गंभीर दखल घेतली. न्यायालयाने केंद्र व राज्य शासनासह संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावत त्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचेही आदेश दिले.

न्यायालयात याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. ‘विदर्भ कनेक्ट’चे सचिव दिनेश नायडू, महावितरणचे माजी संचालक अनिल पालमवार, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. महानिर्मितीच्या परळी, कोराडी, चंद्रपूर व भुसावळ येथील एकूण १ हजार २५० मेगावॅट क्षमतेचे सहा वीजनिर्मिती युनिट बंद करून त्याऐवजी कोराडी प्रकल्पात ६६० मेगावॅटचे दोन युनिट सुरू करण्यात येणार आहेत.

pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
eknath shinde MLA
Riots During Elections : “निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव”, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा!
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!
rickshaw driver punched police crime against wife mother along with rickshaw driver
जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा – लोकजागर : अनाकलनीय ‘अडवणूक’

या प्रकल्पाचा विस्तार झाल्यास मानवी आरोग्य, पर्यावरण व शेती धोक्यात येईल. प्रकल्पातील राखेच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर होईल. यापूर्वी राखेमुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोळशावर चालणारे सर्वाधिक वीज प्रकल्प विदर्भात आहेत. त्याद्वारे १६ हजार २९६ मेगावॅट वीज उत्पादन होते. विदर्भाची गरज केवळ दोन हजार मेगावॅटची आहे. उर्वरित वीज राज्याच्या अन्य भागाला वितरित केली जाते. त्यामुळे प्रकल्प विस्ताराचा निर्णय रद्द करावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर तर, महानिर्मितीतर्फे ॲड. मोहित खजांची यांनी कामकाज पाहिले. याचिकेत महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्प परिसरात २९ मे २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या विस्ताराला पर्यावरणविषयक परवानगीबाबत निर्णयासाठी जनसुनावणी घेतली.

हेही वाचा – आता जंगलातला वाघ अवघ्या ३० सेकंदात मोबाईल आणि संगणकावर येणार, काय आहे हे ‘ट्रेलगार्ड एआय’ तंत्रज्ञान

ही जनसुनावणी पर्यावरण व वन विभागाद्वारे १४ सप्टेंबर २००६ रोजी जारी अधिसूचनेची पायमल्ली करणारी बेकायदेशीर होती. जनसुनावणीचा योग्य प्रचार नसल्याने ग्रामीण नागरिक सुनावणीत सहभागी होऊ शकले नाही. याप्रसंगी अनेकांना बोलू दिले नसल्याचाही आरोपही याचिकाकर्त्यांनी केला. महानिर्मितीच्या दोषी अधिकाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचीही मागणी याप्रसंगी केली गेली.