नागपूर: करोनापासून सोन्याचे दर नियंत्रणात येत नाही. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचिवर पोहचल्याने चिंता वाढली होती. परंतु काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळळाला. आता पून्हा सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली. परंतु मागील २४ तासांत सोन्याचे दर पून्हा घसरले असून या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
देशात सोने- चांदीच्या दागिन्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलेच आकर्षन आहे. दसरा, दिवाळीसह इतरही मुहर्तावर सोने- चांदीचे दागिने, देवी- देवतांची मुर्तीसह इतरही वस्तू खरेदी करणाऱ्यांची भारतात कमी नाही. यंदाच्या दिवाळीत सोने- चांदीचे दर विक्रमी उंचिवर होते. त्यानंतरही धनत्रयोदशीच्या मुहर्तावर नागपुरातील सराफा बाजारात सुमारे दीडशे कोटीचा व्यवसाय झाल्याचा अंदाज व्यवसायिकांनी नोंदवला. त्यामुळे आताही नागरिकांमध्ये सोने- चांदीच्या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचा जोर कायम दिसत आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात गुरीवारी सोने- चांदीच्या दरात किंचित वाढ नोंदवली होती. परंतु दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हे दर पून्हा घसरल्याचे दिसत आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील सराफा बाजारात गुरूवारी (६ नोव्हेंबर २०२५ रोजी) सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटमध्ये १ लाख २१ हजार रुपये होते. तर २२ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख १२ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ९४ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ७८ हजार ७०० रुपये होते. हे दर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (७ नोव्हेंबर २०२५ रोजी) २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख २० हजार ५०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ लाख १२ हजार १०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ९४ हजार, १४ कॅरेटमध्ये ७८ हजार ३०० रुपये होते. त्यामुळे ६ नोव्हेंबरच्या तुलनेत नागपुरात ७ नोव्हेंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम ५०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ४०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. हे दर येत्या काळात मात्र वाढण्याचा अंदाज सराफा व्यवसायिकांकडून नोंदवला जात आहे.
चांदीच्या दरातही घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर ६ नोव्हेंबरला प्रति किलो १ लाख ४९ हजार ८०० रुपये होते. हे दर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (७ नोव्हेंबर २०२५) प्रति किलो १ लाख ४९ हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ६ नोव्हेंबरच्या तुलनेत ८ नोव्हेंबरला चांदीच्या दरातही प्रति किलो ६०० रुपयांची घट झाली आहे.
