लोकसत्ता टीम

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरी येथे मोठा स्फोट झाला. यात मानवी चूक आहे की तांत्रिक चूक हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दारुगोळा हाताळण्यासाठी निश्चित अशी प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो ही प्रक्रिया समजून घेताना स्फोटाचे नेमके कारण शोधण्यास मदत होते. ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये दारुगोळा आणि स्फोटके यांचे उत्पादन खूपच संवेदनशील असते, त्यामुळे येथे कडक सुरक्षा नियमावली पाळावी लागते.

भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटाने पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की इमारतीचे छत कोसळले, आणि १४ कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेने ऑर्डिनन्स फॅक्टरींमधील सुरक्षा नियमावलीच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुरक्षा नियमावलीची सद्यस्थिती

ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा तयार करण्याचे काम अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक आहे. यासाठी भारत सरकारने फॅक्ट्री ॲक्ट १९४८ आणि एक्सप्लोजीव्ह ॲक्ट १८८४ अंतर्गत कठोर नियमावली लागू केली आहे. कर्मचाऱ्यांना पीपीई (वैयक्तीक सुरक्षा उरकरण, आग प्रतिबंधक यंत्रणा, नियमित प्रशिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींच्या सरावाचे पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय, आधुनिक यंत्रसामग्री आणि डिजिटल सेन्सर्सच्या मदतीने स्फोट टाळण्याचे प्रयत्न होतात.

दुर्घटनेमुळे उघड झालेले प्रश्न

भंडारा फॅक्टरीतील स्फोटामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांतील त्रुटी समोर आल्या आहेत.
१)आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत होत्या का?
२). स्फोटक पदार्थ योग्य प्रकारे साठवले गेले होते का?
३) कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले होते का?

सुधारणांची गरज

  • स्फोटक पदार्थांच्या हाताळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे.
  • कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्य तपासणी अनिवार्य करावी.
  • आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी एसडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.
  • भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी केवळ नियम तयार करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठीही विशेष लक्ष दिले पाहिजे.

भंडारा येथील दुर्घटनेमुळे प्रशासनाला सुरक्षेच्या महत्त्वाची पुन्हा जाणीव झाली आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये सुरक्षेसाठी कठोर नियमावली लागू असते, कारण या फॅक्टरीत स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा तयार केला जातो.

स्फोटक पदार्थांसाठी विशेष सुरक्षा

स्फोटक पदार्थ सुरक्षित अंतरावर आणि विशिष्ट तापमानात ठेवले जातात. मशीनरी, उपकरणे, आणि रसायने यांची नियमितपणे तपासणी केली जाते. वीज उपकरणे, स्फोटक रसायने, आणि आग प्रतिबंधक प्रणाली कार्यक्षम आहेत की नाही, याची पाहणी केली जाते. सध्या अनेक ऑर्डिनन्स फॅक्टरींमध्ये डिजिटल सेन्सर्स व मॉनिटरिंग सिस्टम बसवली जाते, ज्यामुळे आगीचा धोका किंवा इतर अपघात लवकर ओळखता येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सरकारच्या विविध कायद्यांनुसार आणि अंतर्गत सुरक्षा धोरणांनुसार सर्व कर्मचारी आणि मालमत्तेची काळजी घेण्यासाठी नियमित प्रयत्न केले जातात. सुरक्षेसाठीची नियमावली ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्र भारत लिमिटेड आणि इतर संबंधित संरक्षण कंपन्यांमधून निश्चित केली जाते.