नागपूर : नागपूर-शहडोल-नागपूर नवीन रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गाडी क्रमांक ०८२८७ शहडोल-नागपूर उद्घाटन विशेष २९ ऑगस्टला धावेल. ही विशेष गाडी दुपारी दीड वाजता सुटेल आणि नागपूरला ४ वाजता पोहोचेल. ही गाडी उमरिया, कटनी दक्षिण, जबलपूर, नैनपूर, सिवनी, छिंदवाडा, सौसरमार्गे नागपूरला येईल.

त्यानंतर नागपूर-शहडोल एक्स्प्रेस साप्ताहिक गाडीची नियमित सेवा ४ नोव्हेंबर पासून सुरु होईल. ११२०१ नागपूर-शहडोल एक्स्प्रेस नागपूरहून ११.४५ वाजता सुटेल. नागपूरहून दर सोमवारी निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.२९ वाजता शहडोलला पोहोचेल. ११२०२ शहडोल-नागपूर एक्स्प्रेस शहडोल येथून दर मंगळवारी पहाटे ५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.