बुलढाणा : प्रारंभीपासून अपघातांनी गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर चक्क व्हिडिओ पाहात खासगी बस चालविणाऱ्या बहाद्दर चालकाविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ सार्वत्रिक झाला होता. त्याची गंभीर दखल घेत परिवहन विभागाने कारवाईची चक्रे फिरविली. संगीतम ट्रॅव्हलची एम.एच. १९ सिएक्स ५५५२ क्रमांकाची बस नागपूरवरून अमरावतीमार्गे समृद्धी महामार्गाने पुण्याला जात होती. यावेळी ट्रॅव्हल्स चालक धनंजय कुमार रवींद्रनाथसिंह बसच्या डॅश बोर्डवर मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत बस चालवत होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बसचा परवाना जळगाव खान्देशचा असल्याने जळगाव ‘आरटीओ’ने ट्रॅव्हल्स जप्त केली.

हेही वाचा : खासगीकरणाच्या विरोधात वंचित आक्रमक; अकोल्यात काढला इशारा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरनजीकच्या समृद्धी मार्गावर घडला. त्यामुळे बुलढाणा आरटीओ प्रसाद गाजरे यांच्या पुढाकाराने मेहकर पोलिसांत तक्रार देण्यात आली. ट्रॅव्हल्स चालक धनंजय कुमार सिंग (काजूपाडा, पोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर मोठे अपघात होत असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.