बुलढाणा : राज्य समन्वय समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांनी लाखो कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याची बुलढाण्यातील हजारो कर्मचाऱ्यांची भावना आहे. या संतापाचा उद्रेक होऊन कर्मचाऱ्यांनी काटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारीत पायदळी तुडवले.
हेही वाचा – वर्धा : अपंग बालकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरा केला जन्मदिवस
आज, मंगळवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामसेवक संघटनेचे बुलढाणा तालुका अध्यक्ष विलास मानवतकर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मानवतकर यांच्यासह आक्रमक झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी काटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायदळी तुडवले. यावेळी मानवतकर म्हणाले की, विश्वास काटकर यांनी संपात सहभागी २९ पैकी कुठल्याही संघटनेला विश्वासात न घेता, संप मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला. काटकर यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वासघातच केला.