बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी व रहिवाशांना रविवारी रात्रभर निसर्गाचे भीषण तांडव अनुभवायला मिळाले. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली. शेडनेटचे देखील नुकसान झाले असून अनेक गावांत रात्रीपासून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झालाच नाहीये.

हेही वाचा : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ३१ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील तेराही तालुक्यात २६ नोव्हेंबरच्या रात्री पावणेदहाच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. हा पाऊस अधूनमधून विसावा घेत आज, सोमवारी सकाळपर्यंत सुरूच होता. देऊळगाव राजा, लोणार, सिंदखेडराजा आदी तालुक्यात संमिश्र आकाराच्या गारांनी रब्बी पिके व शेडनेटचे अतोनात नुकसान केले. रातभर कोसळणाऱ्या पावसाने कपाशी, बहरात आलेल्या तूर, मका, भाजीपाला, फळबागा चे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रीपासून पाऊस सुरु असून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.