चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लोणी येथे मुलाने वयोवृद्ध आई-वडिलांना एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी वडिलांना कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते.

हेही वाचा : ‘आमच्या गावात विकसित भारत संकल्प यात्रा नको’, ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज पांडूरंग सातपुते (४५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आरोपी मुलांने आई आणि वडिलांना एका खोलीत बंद केले. यानंतर अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने ४ आणि हातावर २ वार तर वडिलांच्या डोक्यावर २ वार केले. यानंतर तो वहिनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपल्याने तिचा जीव वाचला. या घटनेत आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली.