चंद्रपूर : महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या बारा टक्के आहे. या लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या ४८ पैकी किमान चार ते पाच जागा मुस्लीम समाजाला मिळायला हव्यात. परंतु, काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मुस्लीम समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. हाच काय काँग्रेसचा सामाजिक न्याय व हीच का भाजपची सामाजिक समरसता, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांनी येथे उपस्थित केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अब्दुल रहमान, तेली समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे पदाधिकारी यांनी आज येथे पत्रपरिषद घेऊन काँग्रेस व भाजपवर आरोप केले.

हेही वाचा : “सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी अब्दुल रहमान म्हणाले, काँग्रेसला सामाजिक न्यायचा नारा देण्यासाठी ७० वर्षे का लागली? जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी असे आज काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणत असले तरी महाराष्ट्रात १२ टक्के मुस्लिमांची संख्या असताना मुस्लीम समाजाच्या एकाही नेत्याला काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही, हे अतिशय वाईट आहे. भाजपला केंद्रात सत्तेत एक मिनिट राहण्याचा अधिकार नाही. मंदिर-मस्जिद बांधने सरकारचे काम नाही. भाजप लोकांना यातच गुंतवून ठेवत आहे. या पक्षानेही एकही जागेवर मुस्लीम उमेदवार दिला नाही. वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय योग्य आहे. वंचित बहुजन आघाडी ही बी टिम नाही तर खऱ्या अर्थाने वंचितांचे प्रश्न लोकसभेत लावून धरणारी, वंचितांना न्याय देणारी ॲड.प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी आहे, असेही रहमान म्हणाले.