गोंदिया : जिल्ह्यात गोमांस तस्कर सक्रीय असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत साडे चार क्विंटल गोमांस वाहतूक करणाऱ्या दोन गोमांस तस्करांना सालेकसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळून गोमांस व वाहतूकीसाठी वापरलेली कार असा एकूण ६.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम नासीर कुरेशी (वय २९), प्रमोद राजकुमार मोहबे (वय ३३) दोघेही राहणार कुंभारटोली, आमगाव अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.

सालेकसाचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सालेकसा येथील आमगाव दरेकसा मार्गावरील एचपी पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी कारवाई केली. यावेळी पंचासमक्ष पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमएच ४६ एक्स ७५४१ ला थांबवून पाहणी केली असता कारच्या मागच्या सिटवर १५ थैले आढळून आले ज्यामध्ये अंदाजे ३० किलो ग्रॅमप्रमाणे ४५० किलो ग्रॅम गोमांस दिसून आले. ज्याची किंमत ६७ हजार ५०० रुपये आहे. यावेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर गोमांस डोंगरगड येथे विना परवाना नेत असल्याचे आरोपींनी सांगितले.

हेही वाचा : ‘हे’ भाजपला महागात पडेल, रविकांत तुपकर म्हणाले ‘सर्वाधिक आमदार विदर्भात असूनही…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी सोलकसा पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात कलम ५,५(सी),९,९(ए) महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस उपनिरीक्षक अजय पाटील, पोलिस नायक रितेश अग्निहोत्री, पोलिस शिपाई इंगळे, वेदक, कटरे, गोसावी यांनी केली.