नागपूर: प्रत्येक घरी टीव्ही असतो आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवणा-या वाहिन्यांसाठी सेट टॉप बॉक्स लावला जातो. तसा तो दुर्लक्षित असतो. वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबले तरच त्याकडे लक्ष जाते. तसा त्यापासून काही धोका नसतो. पण त्याला जोडलेल्या तारांमधून विद्युत प्रवाह आला तर काय होते याचा प्रत्यय खैरी पन्नासे या गावात आला. खेळता खेळता एका चिमुकल्याचा हात सेट टॉप बॉक्सला लागला अन् अघटित घडले.

मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खैरी पन्नासे (नवीन) येथील प्रियांशु ज्ञानेश्वर चव्हारे (४ वर्ष) हा बालक घरी खेळत असताना याचा हात घरच्या टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सला लागला. त्यात विद्युत प्रवाह असल्याने त्याला विजेचा धक्का बसून तो खाली कोसळला.

हेही वाचा… फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री, मग स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कुठे लावणार हजेरी? झेंडावंदनावरून सर्वत्र उत्सुकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आवाज ऐकून वडील ज्ञानेश्वर जागे झाले. त्यांना मुलगा बेशुद्ध अवस्थेत मुलगा खाली पडलेला दिसला. त्यांनी मुलाला हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांनी वडील ज्ञानेश्वर चव्हारे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.