नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही ‘ उठ-बस’ सेना आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते मंगळवारी रात्री नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. त्यांनी राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले व त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी नागपूरलगत कन्हान येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी शिंदे मंगळवारी रात्री नागपूरमध्ये आले.

मोदी यांनी सोमवारी चंद्रपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या पक्षाचा ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका करीत खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला नकली ठरवून गेले, त्यांच्यासोबत चायनिज माल बसला आहे, अशी टीका केली होती. याबाबत शिंदे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “ उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही ‘उठ-बस’ सेना आहे. आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची सेना आहे. काँग्रेस प्रणीत शिवसेना नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी, सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, त्यांनी सत्तेसाठी धनुष्यबाण गहा ठेवला. रोकड मोजणाऱ्यांना मोदींना भेकड म्हणण्याचा काहीही अधिकार नाही.

हेही वाचा : कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या विकासात योगदान आहे. महाराष्ट्रातून आम्ही त्यांना ४५ जागा जिंकून देऊ. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.