नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी गृहशहर आणि स्वग्राम असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. तरीही नागपूर हे गृहशहर असलेले सायबर क्राईम व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची बदली झालेली नाही, त्यामुळे बहुजन वंचित आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक प्रफुल्ल माणके यांनी थेट निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

गृहशहर असलेले अनेक पोलीस अधिकारी बदलीस पात्र असूनही ‘साईड पोस्टिंग’च्या नावाखाली बदलीपासून वाचले. त्यांची नावे पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविलीच नाहीत. पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांचे नागपूर हे गृहशहर आहे. त्यांचे शिक्षणही नागपुरातच झाले. त्यामुळे त्यांचे समाजात आणि राजकीय पक्षांसोबत संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा…काँग्रेसने वर्धेची जागा सोडली? मतदारसंघनिहाय चर्चेत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांडक हे पोलीस उपायुक्त असून त्यांच्या अधिनस्थ जवळपास ४०० ते ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामुळे स्थानिक राजकीय स्थितीवर परिणाम पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन व लोकसभा निवडणूक पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पडावी यासाठी गृहशह चांडक यांची तत्काळ बदली व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.