नागपूर : एकेकाळी भाजप शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. ओबीसी समाजातील नेत्यांनी या पक्षाला मोठे केले. आता त्याच ओबीसींना भाजपचे लोक अपशब्द बोलून अपमानित करत आहेत. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपमान सहन करण्यापेक्षा भाजप सोडावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

पटोले म्हणाले, मला बावनकुळे यांना सांगायचे आहे की, ज्या भाजपमध्ये ते आहेत त्या पक्षाचे लोक ओबीसी समाजाला श्वान म्हणत असतील तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडले पाहिजे. त्या पक्षात तुम्ही गप्प बसले असाल तर समाजाचा अपमान करण्यासाठी तुम्ही तिथे बसला आहात, असा त्याचा अर्थ होतो. नाना पटोले समोरून लढतो, मागून वार करत नाही म्हणून जे आवाहन मी केले त्यावर बावनकुळेंनी कृती करावी, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा : “अमित शाह यांनी महाराष्ट्र अदानीला विकला”, कन्हैया कुमार गरजले, “कमळाचे फूल उगवले अन् दहशत, गुंडागर्दीचे पीक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी, शाह यांच्या बॅग तपासा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्याही हेलिकॉप्टरची काल दोन वेळा तपासणी केली गेली. माझ्याजवळ बॅगच नाही तर काय मिळेल? निवडणूक आयोगाला जे करायचे आहे ते ठीक आहे. पण, आमची मागणी आहे की मोदी, शाह आणि योगींच्या हेलिकॉप्टरमधील बॅगचीही तपासणी व्हायला हवी.