नागपूर : अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावणारे नागपूरकर ज्येष्ठ कवी राजा बढे यांनी लिहिलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या अजरामर गीताला राज्यगीत म्हणून दर्जा देण्यात आल्यानंतर सी.पी. ॲन्ड बेरार महाविद्यालयासमोरील जागेवर हे राज्यगीत एका कोनशिलेवर लिहिण्यात आले. मात्र, या कोनशिलेच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा : सिंदखेडराजात जिजाऊ प्रेमींचा जनसागर, जयंतीनिमित्त जन्मस्थळी हजारो भक्त नतमस्तक

ज्येष्ठ कवी राजा बढे यांचे स्मारक महालातील सी.पी. ॲन्ड बेरार महाविद्यालयासमोर उभारण्यात आले आहे. या चौकाला कविवर्य स्व. राजा बढे यांचे नाव देण्यात आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १७ मार्च २०१८ या चौकाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी या चौकाजवळ राजा बढे यांनी लिहिलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताची कोनशिला लावण्यात आली. मात्र, ही कोनशिला आज कचऱ्याच्या अडगळीत आहे. या कोनशिलेच्या बाजूला कचराघर करण्यात आले असून आजूबाजूला दगड माती विटा टाकण्यात आल्या आहेत. शिवाय कोंबड्यांची विक्री करणारे त्या ठिकाणी असतात. महापालिकेने तुळशीबाग चौकाचे राजा बढे असे नामकरण केल्यानंतर त्यांच्या गौरवात एक शिला लावली होती. त्या शिलेत काही संदर्भ चुकीचे होते. शिवाय त्यात व्याकरणाच्याही अनेक चुका होत्या.

हेही वाचा : नागपूर : आशा व गटप्रवर्तक आजपासून संपावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यगीताच्या शिलेजवळ कचराघर आणि अतिक्रमण केले असेल तर तेथे कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत सांगण्यात येईल.” – गणेश राठोड, सहायक आयुक्त, गांधीबाग झोन, महापालिका