नागपूर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये नोंदवले गेले होते. या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोमवारी (१२ फेब्रुवारी) नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ६२ हजार ८०० रुपये नोंदवले गेले.

सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ- उताराचा क्रम सुरू आहे. नागपुरात सोमवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी १.२६ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार रुपये होता.

हेही वाचा : खळबळजनक! जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

दरम्यान २ फेब्रुवारीच्या दुपारी नागपुरात २४ कॅरेट सोन्याचे दर ६३ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६० हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ५०० रुपये होते. त्यामुळे २ फेब्रुवारीच्या तुलनेत १२ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम तब्बल ७०० रुपयांनी घटलेले दिसत आहे. सोन्याचे दर घटल्याने लग्न समारंभासह इतर कारणांनी सोन्याची खरेदी करायची असलेल्या ग्राहकांना मोठी दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोन्याच्या दरात सतत बदल होत असले तरी काही महिन्यात हे दर ६५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा : प्रेयसीचे फिल्मी स्टाईल अपहरण, प्रियकराने घरात डांबले; आईवडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीचे सोन्याचे दर

नागपुरात २९ जानेवारीला २४ कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्राम ६२ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार २०० रुपये होता. २५ जानेवारीला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ६२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ५० हजार १०० रुपये, १४ कॅरेटचा दर ४० हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ९०० रुपये होता.