नागपूर : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून नियमितपणे जनता दरबार घेतात. लोकांच्या समस्या ऐकून घेतात. निवेदने स्वीकारतात. ज्या समस्या तत्काळ सोडवणे शक्य होईल त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. दिवसेंदिवस त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वस्तरातील नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. रविवारी झालेल्या जनता दरबारात दृष्टीहिन क्रिकेटपटूंनी गडकरी यांची भेट घेतली.

हेही वाचा : अंधारात नेऊन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी यांचे प्रयत्न नेहमीच क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे राहिले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक क्रीडापटूंच्या कलागुणांना चालना देणेही सुरू केले आहे. हीच बाब लक्षात घेऊन रविवारी दृष्टीहिन क्रिकेटपटूंनी गडकरी यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन विदर्भ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आलेल्या खेळाडूंनी एक विशिष्ट प्रकारचा क्रिकेटचा चेंडू गडकरी यांना भेट दिला. फटका मारल्यानंतर या चेंडूतील छर्रे आवाज करतात. त्या आवाजाच्या आधारावर दृष्टीहिन क्षेत्ररक्षकांना चेंडूचा अंदाज येतो. गडकरी यांनी भेट स्वीकारली.