नागपूर : महायुतीचा ४५ च्या वर जागा जिंकण्याचा निकष आहे. जिंकण्याचा निकषांमध्ये कधी एक पाय भाजपाला मागे घ्यावा लागू शकतो. कधी शिंदेंना तर कधी अजित पवार यांना मागे घ्यावा लागू शकतो. आता कुणाला किती जागा मिळेल हे सांगता येणार नाहीं पण सगळ्यांना सन्मानजनक जागा मिळतील असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते आजच्या दिवसापर्यंत महायुती मध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय झाला नाही. प्राथमिक चर्चा झाली आहे आणि प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. साधारणत ११ किंवा १२ मार्चपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होईल.

हेही वाचा…“आम्हाला कमी लेखू नका”, छगन भुजबळांचा भाजपाला इशारा; जागावाटपाबाबत एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

केंद्रीय नेतृत्वाकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपली बाजू मांडली. आम्ही आमची बाजू मांडली आहे .कोणताही फॉर्म्युला नाही. फक्त एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या आहेत.जो उमेदवार जिथून निवडून येऊ शकतो ती जागा समन्वयाने ती त्या पक्षाला दिली जाईल. आणि त्यासाठी आम्ही काम करू असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…‘अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटं चर्चा’, त्या दिवशी मातोश्रीवर काय झालं? रावसाहेब दानवे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरी हे ६५ टक्के मतांनी निवडून येतील. झालेल्या एकूण मतदानाच्या ६५ टक्के मत घेऊन गडकरी निवडून येतील एवढी क्षमता त्याच्यात आहे.ज्याला वाटत त्यांनी निवडणूक लढवावी उलट आमची इच्छा नाना पटोले यांनी नागपूरमध्ये निवडणूक लढवावी. असेही बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडी बद्दल मी काही बोलणे योग्य नाही. कुणाला किती जागा द्यायच्या, वंचितला सोबत घ्यायचे की अजून कुणाला हा त्याचा अधिकार आहे.त्याच काय चालले आहे मला माहिती नाही असेही बावनकुळे म्हणाले.