नागपूर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी नागपुरातील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्यांचा नागपूर लोकसभेची निवडणूक लढवत आहे. सलग दोन वेळा नितीन गडकरी नागपुरातून मोठ्या मताधिक्याने जिंकले आहे. यंदा तिसऱ्यांदा निवडणूकीदरम्यान ते शहरातील विविध भागात फिरून मतदारांना आशीर्वाद मागत आहेत. योगी आदित्यनाथ यांची सोमवारी नागपुरातील शिवाजी चौक, फ्रेन्ड्स काॅलनी, काटोल रोड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच निवडणूक, जिचा निकाल आधीच कळलाय…’
सभेच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ हे नितीन गडकरी यांना जिंकवण्यासाठी आवाहन करणार आहे. सभेसाठी नागपुरात आल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांचे निवासस्थान गाठले. येथे त्यांचे गडकरी यांच्या कुटुंबियांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागत करणाऱ्यांमध्ये गडकरी यांच्या नातवंडांचाही सहभाग होता. गडकरी यांनी गडकरींच्या सर्व नातवंडांसह कुटुंबियांची विचारपूस केली. योगी आदित्यनाथ यांनी गडकरी यांच्या देवघरातील गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत योगी आदित्यनाथ यांची बराच वेळ गप्पाही रंगल्या होत्या.