लोकसत्ता टीम

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार ही त्यांच्याच वर्धा जिल्ह्यात अर्धवट असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना पहिल्याच पावसात बसला.

हिंगण तालुक्यातील खैरी पन्नासे शिवारात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरण एकतर उशिरा सुरु करण्यात आले. त्यामुळे पावसाळा सुरू होऊनही काम पूर्ण होऊ शकले नाही .शिवाय ज्या भागात खोलीकरण झाले त्या भागातील आजूबाजूला असलेल्या शेतातील गाळ नाल्यात येणार नाही यासाठी बांध तयार करण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी पहाटे काही तास आलेल्या पहिल्याच पावसात या नाल्याच्या बाजूला असलेल्या अभिमान झाडे, रमेश पन्नासे, लल्लन पाल, जगन ठाकरे आदी पाच सहा शेतकऱ्यांच्या शेतातील उपयुक्त माती व गाळ वाहून या नाल्यात गेला. यातील काही शेतात पेरणी सुद्धा करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-महापारेषण कंपनीत लवकरच बंपर भरती

आता पूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे शासनाने या कामाची पाहणी करून शेताचे नुकसान होऊ नये यासाठी नाला व्यवस्थित करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.